नगर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे 125 वे वर्ष आम्ही साजरे करत आहे, पण आज सुद्धा भारतीय समाजातील मोठा घटक हे बाबासाहेबांना एका व...
नगर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे 125 वे वर्ष आम्ही साजरे करत आहे, पण आज सुद्धा भारतीय समाजातील मोठा घटक हे बाबासाहेबांना एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित समजत आहेत ही एक मोठी चुक आहे. डॉ.बाबासाहेबांनी या देशातील संपूर्ण मानव जाती व दिनदुबळ्यांसाठी मोठे कार्य केले असल्याचे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे उपाध्यक्ष इंजि.अनीस शेख यांनी केले. एका विशिष्ट समाजासाठी असती तर आज फक्त त्या समाजाचाच उद्धार झाला असता, पण आज घटनेमुळे या देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांचा फायदा होत आहे म्हणून बाबासाहेब हे संपूर्ण भारत वर्षातील प्रत्येकासाठी आदरणीय आहे. व घटनेमुळे बाबासाहेबांनी भारतातील सर्व नागरिकांना समानतेचा संदेश दिला आहे.









