नगर - येथील रेसिडेन्शिइल हायस्कूलमधील शिवानी संतराम दळवी हिने नुकत्याच झालेल्या ज्ञानवर्धिनी परीक्षेत 150 पैकी 147 गुण मिळवून जिल्हा ग...
नगर - येथील रेसिडेन्शिइल हायस्कूलमधील शिवानी संतराम दळवी हिने नुकत्याच झालेल्या ज्ञानवर्धिनी परीक्षेत 150 पैकी 147 गुण मिळवून जिल्हा गुणवत्तायादीत चौथी आली आहे. हंगा गावचे माजी सरपंच संतराम दळवी यांची ती कन्या आहे. शिवानी हिचे शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके, प्राचार्य दोडके, शंकर चेडे, बाबा नवले, धोंडिबा नगरे, राजू शिंदे, सरपंच यमुनाबाई नवले, उपसरपंच अभिमान साठे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तिला दरे मॅडम, मोरे सर, निवडुंगे मॅडम, गायकवाड सर, पाटील सर, आई आशा दळवी, वडील संतराम दळवी, लता मोढवे यांचे मार्गदर्शन लाभले.










