मुंबई - राज्यात कोटी २० लाख ज्येष्ठ नागरिक असूनही सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मार्च ...
मुंबई - राज्यात कोटी २० लाख ज्येष्ठ नागरिक असूनही सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मार्च महिन्यात झालेल्या अिधवेशानात सरकारने ज्येष्ठांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर आणण्याचे म्हटले होते. तसेच वृद्धाश्रमांना सध्या देण्यात येणाऱ्या ९०० रुपयांच्या अनुदानात १५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल असे सांगितले. अर्थसंकल्पीय अिधवेशन संपण्याअगोदर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून सांगितले.
त्याची अंमलबजावणी कधी करणार असा प्रश्न संजय दत्त यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बडोले म्हणाले की, ज्येष्ठांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने उच्चाधिकार समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. आता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात वरिष्ठ नागरिकांचे वय ६० वर्ष मानण्यात येईल. स्वयंसेवी संस्थांकडून राज्यात ३९ वृद्धाश्रम ३१ मातोश्री वृद्धाश्रम चालविण्यात येतात परंतु त्यांना राज्य सरकारकडून ९०० रुपये इतके तुटपुंजे अनुदान मिळल्यामुळे वृद्धाश्रम चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे ही अनुदानाची रक्कम वाढवण्यात येणार का असा प्रश्न संजय दत्त यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना बडोले यांनी वृद्धाश्रमांना सध्या देण्यात येणा ऱ्या ९०० रुपयांच्या अनुदानात १५०० रुपयांपर्यं वाढ करण्यात येईल असे सांगितले.










