सायंकाळी 6 ची वेळ, ठिकाण निरंकारी भवन समोरील जॉगिंग ट्रॅक मैदान, वयोगट 5 ते 14 वर्षांची 25 ते 30 लहान निरागस मुले-मुली, सोबत त्यांना...
सायंकाळी 6 ची वेळ, ठिकाण निरंकारी भवन समोरील जॉगिंग ट्रॅक मैदान, वयोगट 5 ते 14 वर्षांची 25 ते 30 लहान निरागस मुले-मुली, सोबत त्यांना मार्गदर्शन करणारी संचालीका, हातात ग्लोज, तोंडावर मास्क लावुन, हातात झाडू घेवुन ट्रॅकच्या कडेने साचलेला कचरा सोबत आणलेल्या गोण्यांमध्ये भरणारे चिमुकले हात.....
नगर- संत निरंकारी मंडळातर्फे मिस्किन रोडवरील निरंकारी सत्संग भवन येथे लहान मुलांसाठी नियमितपणे चालविले जात असलेल्या बाल संगत (बालसंस्कार वर्ग) मध्ये येणार्या लहान मुलांना लहानपणा पासूनच अध्यात्माची आवड निर्माण व्हावी व त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत. मर्यादापूर्ण, विनयशिल व भेदभावरहित जीवन त्यांनी जगावे यासाठी त्यांना बाल संगतच्या माध्यमातून शिकवण दिली जाते.
सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून तसेच निरंकारी बाबाजींच्या परिसर व शहर स्वच्छ ठेवण्याचे केलेले आवाहन व दिलेली प्ररेणा प्रत्यक्षात साकारण्यासाठी बाल संगतची संचालीका सौ.सिमा किरतानी, मोहित थावानी, दिनेश चित्राल यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी जॉगिंग ट्रॅकवर साचलेला कचरा 10 ते 12 गोण्यांमध्ये गोळा करुन कचरा कुंडीत नेवुन टाकला.
सायंकाळच्या वेळत जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी आलेल्या अनेकांनी निरंकारी बाल संतांचे त्यांनी राबविलेल्या साफसफाईच्या उपक्रमाचे कौतुक केले. व मुलांना लहानपणापासूनच अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेत असल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले.









