नगर - तालु्क्यातील पाथर्डी रोडवरील शहापूर येथे श्रीमंतयोगी राष्ट्रसंत भगवानबाबा व वैराग्याचे महामेरु संत वामनभाऊ महाराज यांच्या मंदिरा...
नगर - तालु्क्यातील पाथर्डी रोडवरील शहापूर येथे श्रीमंतयोगी राष्ट्रसंत भगवानबाबा व वैराग्याचे महामेरु संत वामनभाऊ महाराज यांच्या मंदिराचा भुमिपूजन सोहळा चैत्र शुद्ध प्रतिपदा (पाडव्याच्या) सुमुहूर्तावर 8 एप्रिल 2016 रोजी स.10 ते 11 वेळेत संपन्न होणार आहे. हा भुमीपूजन सोहळा गुरुवर्य श्री.दत्त दिगंबर महाराज, महंत शंकर भारती महाराज, ह.भ.प. रामगिरी महाराज, ह.भ.प.लक्ष्मण महाराज, संत चरणरज छगन महाराज मालुसरे, ह.भ.प. संतोष महाराज गिते, ह.भ.प. अमोल महाराज जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
जय भगवान महासंघ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सानप यांचे उपस्थितीत नारळ फोडून भूमिपूजन संपन्न होत असून कार्यक्रमास पालकमंत्री ना.राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ.शिवाजी कर्डीले, आ.संग्राम जगताप, आ.राहुल जगताप, उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, वाहुतक सेना संघाचे जिल्हाध्यक्ष बाबा सानप आदींसह नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स.सभापती, सरपंच, सोसा.चे अध्यक्ष यांच्यासह मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.










