श्रीरामपूर - तालुक्यातील दिलीप औचित सोनवणे या युवकाचा बेलापूर येथील पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावर भर उन्हात चक्कर येऊन जागीच मृत्यु...
श्रीरामपूर - तालुक्यातील दिलीप औचित सोनवणे या युवकाचा बेलापूर येथील पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावर भर उन्हात चक्कर येऊन जागीच मृत्यु झाला.
सोमवारी बेलापूर येथील मागील दिलीप औचित सोनवणे, वय 45, रा. एकलहरे, श्रीरामपूर हा युवक रस्त्यावर भरदुपारी चक्कर येऊन पडला. याची कोणालाच माहिती नव्हती. रस्त्याने येणाऱ्या काही लोकांनी त्यांना तातडीने बेलापूर दूरक्षेत्रामधील पोलीसांना कळविले. पोलिसांनी उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दिलीप यांचा मृत्यु उष्माघाताने झाला असावा, असा पोलीसांनी अंदाज व्यक्त केला. मृतदेहाचे पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वामन नारायण सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.










