श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील प्रभाग 4 मधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक भारत नाहाटा यांनी स्वखर्चाने पाच टॅँकर सु...
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील प्रभाग 4 मधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक भारत नाहाटा यांनी स्वखर्चाने पाच टॅँकर सुरू करून दररोज नागरिकांना ५0 हजार लीटर पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या शहरातील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रभाग 4ची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. नागरिक वाड्या-वस्त्यांवर राहत असून पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नाहाटा यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. नाहाटांनी पाच टॅँकर सुरू केले. पालिकेनेही तीन टँकर यापूर्वीच सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. नाहाटा म्हणाले, मी कोणत्या गावचा रहिवासी आहे, याचा विचार न करता श्रीगोंदा शहरवासियांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. हे टँकर पाऊस पडेपर्यंत सुरू ठेवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.









