नगर - शिववरद ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन होऊन काही दिवस झाले. मात्र, संघटनेने आदर्श असे काम उभे केले आहे. या कामाची दखल घेत संघटनेचे अध...
नगर - शिववरद ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन होऊन काही दिवस झाले. मात्र, संघटनेने आदर्श असे काम उभे केले आहे. या कामाची दखल घेत संघटनेचे अध्यक्ष रंगनाथ सांगळे यांना मानाचा पुरस्कार मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनेनुसार आपण मोफत रुग्णालय सुरू केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध क्षेत्रांत यश मिळविणार्या प्रभागातील नागरिकांचा आम्ही नेहमीच सन्मान करतो हे आमचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांनी केले.
शिववरद ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रंगनाथ सांगळे यांना एस. एम. जोशी (पुणे) यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच स्वकुळसाळी हितसंवर्धन मंडळाच्या अध्यक्षपदी संजय सायगांवकर, कार्याध्यक्षपदी बाबासाहेब वैद्य आणि सागर शहा याचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. डागवाले बोलत होते. यावेळी संजय झिंजे, शहाजी र्डेंळ, सुभाष दारवेकर, दामोधर भोसले, विशाल भालेराव, हुसेनभाई, वसंत मुळे, धुमाळ, नाना अष्टेकर आदींसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.









