अअ1म0475 ल नगर- स्व.नंदलालजी धूत यांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त फोर्स ऍप्लायन्सेस प्रा.लि. या व्हिडिओकॉन संचलित बुर्हाणनगर येथील कंप...
अअ1म0475 ल
नगर- स्व.नंदलालजी धूत यांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त फोर्स ऍप्लायन्सेस प्रा.लि. या व्हिडिओकॉन संचलित बुर्हाणनगर येथील कंपनींतर्गत भव्य रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी आ.जगताप बोलत होते. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विवेक धर्म, युनियनचे प्रमुख बाबूशेठ टायरवाले, संदिप कर्डिले, कंपनीचे व्यवस्थापक केतन पानवलकर, प्रशांत अंतेपोलू, गणेश गिरगस, गणेश गोंडाळ, संजय हिंगणे, कमाल रिजवान, संजय सिद्धम, एस.जी.मदने, एस.जी.अग्रवाल व कंपनीचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.जगताप यांनी कंपनीने आयोजित केलेल्या शिबीराचे कौतुक केले. रक्तदान शिबीरातून अनेकांना जीवदानही मिळते. परंतु पुढीलवर्षी हे रक्तदाना शिबीराचे आयोजन आपण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर करावे, त्यामुळे इतरही नागरिकांना यामध्ये सहभागी होता येईल, असे आवाहन त्यांनी केले.
आज व्हिडिओकॉन कंपनीच्या माध्यमातून हजारोंना रोजगाराची निर्मिती मिळाली आहे. त्यात महिलांचाही मोठा सहभाग असल्यामुळे आज त्यांच्याही जीवनात मोठा आनंद या कंपनीच्या माध्यमातून आपण देत आहात, ही अतिशय उल्लेखनिय बाब असून, युनियननेही सकारात्मक धोरणाने या कंपनीस सहकार्य करावा, मनपाच्यावतीने सर्वोतोपरि सहकार्य देण्याचे यावेळी मान्य केले.बाबुशेठ टायरवाले यांनी युनियनच्या माध्यमातून सर्वोतोपरि सहकार्य कायम कंपनीस सहकार्य देत असून, यापुढेही निश्चित सहकार्य यापुढेही राहणार असल्याचे सांगून स्व.काकासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी संजय गिरे यांनी आभार मानले. या रक्तदान शिबीरासाठी जनकल्याण रक्तपेढीचे सहकार्य लाभले. शिबीरामध्ये 77 जणांनी रक्तदान केले.










