श्रीगोंदा तालुक्यातील कामठी येथील गुंगा जगन्नाथ आरडे यांच्या बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्या...
श्रीगोंदा तालुक्यातील कामठी येथील गुंगा जगन्नाथ आरडे यांच्या बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवार दि.३ एप्रिल रोजी रात्री घडली यामध्ये १२ बोअऱची बंदुक व १५ जीवंत काडतूसही चोरट्यांनी चोरुन नेले.
गुंगा आरडे यांनी दिलेल्या फिर्य़ादिवरुन श्रीगोंदा पोलीसात गुन्ह्याची नोदं कऱण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, गुंगा आरडे हे आपल्या मुलाची जे इ.इ.मेनची परीक्षा देण्यासाठी मुलगा व पत्नीसह पुणे येथे गेले होते. ते तेथे मुक्कामी राहिले. रविवारी सकाळी परतीच्या प्रवासात असतांना राजु आरडे यांनी भ्रमणध्वनी वरुन फोन केला व सांगितले की, तुमच्या घराचे कंपाउंड व गेट व्यवस्थित आहे मात्र दरवाजा उघडा असून तेथे गर्दी जमलेली आहे. आऱडे यांनी घरी येऊन पाहिले तर तेथे त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, लटकन व किरकोळ दागिने चोरुन नेले तर जातांना त्यांची १२ बोअरची बंदूक 15 काडतूस अशा 1,50000/-रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पो.उप.अधि.विजय लगारे व पो.नि.सोमवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पो.स.ई. भरत मोरे हे करीत आहेत.










