नगर - नगर शहरामध्ये शिवसेनेने सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण केले. सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम केले. भगवान फुलसौंदर व श...
नगर - नगर शहरामध्ये शिवसेनेने सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण केले. सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम केले. भगवान फुलसौंदर व शीलाताई शिंदे यांना महापौरपदावर विराजमान केले. शिवसेनेत घराणेशाही चालत नाही. कॉंग्रेस आघाडीत घराणेशाहीच चालते. एकाच घरात सर्व पदे दिली जातात. वैभव सुरवसे याच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास शिवसेनेत न्याय दिला जाईल. त्याचा योग्य तो सन्मान केला जाईल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी केले.
मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव सुरवसे व उपाध्यक्ष जालिंदर शिंदे यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे माजी आमदार अनिल राठोड यांनी भगवान झेंडा देऊन स्वागत केले. यावेळी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, भगवान फुलसौंदर, अनिल लोखंडे, विक्रम राठोड, अशोक दर्हिेंळे, सुरेश तिवारी, दीपक खैरे, संतोष गेनाप्पा, राजू मंगलारम, अनिकेत कराळे आदींसह कार्यकर्ते, तसेच इंजि. अमोल राणे, सुरेश काळे, इंजि. कांबळे, इंजि. घोलप, पाटोळे, अक्षय कोळी, महेश निमोणकर, संग्राम सांगळे, समीर वाधवणे, शुभम कोळी, श्रीकांत कावरे, वैभव सांगळे, प्रवीण पाटोळे आदी उपस्थित होते.










