नगर - कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी जिद्द व चिकाटी हे गुण अंगी असणे आवश्यक आहे. राहुल धस यांनी प्रबळ इच्छाशक्ती व नि...
नगर - कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी जिद्द व चिकाटी हे गुण अंगी असणे आवश्यक आहे. राहुल धस यांनी प्रबळ इच्छाशक्ती व नियमित अभ्यासाच्या पाठबळावर मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शेवगाव तालुयातील एरंडगावसारख्या छोट्या गावचे राहुल धस रहिवासी आहेत. ग्रामीण भागातील असूनही त्यांनी ध्येय निश्चित करून हे यश संपादन केले आहे, असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले.सत्कारानंतर राहुल धस म्हणाले की, प्रथम आपण ध्येय निश्चित केले. त्यानंतर त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. दिवसातील ठराविक वेळ अभ्यासासाठी राखून ठेवला. अभ्यासात सातत्य ठेवत एमपीएससी परीक्षेत यश संपादन केले. आपली उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली असून, आदर्श असे काम या पदाच्या माध्यमातून करू. वंचितांना न्याय मिळवून देऊ, असे ते म्हणाले.










