मा.पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षकभरत मोरे यांचे पथकामधील पो.कॉ.केशव व्हरटे, पोकॉ.गजानन ग...
मा.पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षकभरत मोरे यांचे पथकामधील पो.कॉ.केशव व्हरटे, पोकॉ.गजानन गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं.1/2013 भा.द.वि. कलम 457, 380, 411, 34 मधील तीन व्रर्षापासून फरार असलेला आरोपी तनवीर रियाज शेख वय-२२ वर्ष रा.श्रीगोंदा दौंड रेल्वे परिसरात येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने दौंड रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून आरोपी तनवीर शेख यास ताब्यात घेतले. त्यास दि.14/4/2016 रोजी 23.18 वा. अटक केली आहे. यातील फरार आरोपी तनवीर शेख व त्याचे साथीदार १) विजय मोहन पवार २) अविनाश औदुंबर दिक्षीत ३) सागर दिलीप श्रीमंदिलकर सर्व रा.श्रीगोंदा ता. श्रीगोंदायांनी श्रीगोंदा शहरातील नामांकीत वकील श्री.श्रीनिवास यशवंत पत्की रा.श्रीगोंदा हे बाहेरगावी गेले असतांना त्यांचे घरी दि. 28/1/2013 रोजी रात्री 1.30 वा.चे दरम्यान यातील आरोपींनी घरात प्रवेश करुन घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा एकूण 6 लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला होता. सदरवेळी आरोपी नामे १) विजय मोहन पवार २) अविनाश औदुंबर दिक्षीत ३) सागर दिलीप मंदिलकर सर्व रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा यांना अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांच्याकडून २ लाख 60 हजार 800 रु. किमतीचा ऐवज हस्तगत केला होता. गेल्या तीन वर्षापासून आरोपी तनवीर शेख हा पोलीसांना गुंगारा देत होता. सदर गु्न्ह्यात आरोपी तनवीर रियाज शेख वय-22 वर्ष रा.श्रीगोंदा हा मिळून आल्याने त्यास दि.14/4/2016 रोजी अटक केली आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी बेलवंडी पोलीस स्टेशनला दरोडा तपास पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे हे करीत आहेत.










