नगर - ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या हिंद सेवा मंडळ ही शैक्षणिक संस्था शतक पार करत आहे. हिंद सेवा मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या कारभारात स...
नगर - ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या हिंद सेवा मंडळ ही शैक्षणिक संस्था शतक पार करत आहे. हिंद सेवा मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या कारभारात सुसुत्रता आणून, अमुलाग्र बदल करुन संपूर्ण मंडळाचा मास्टर प्लॅन तयार करणार आहोत. तसेच काटकसरीने कारभार करुन अनावश्यक खर्चाला फाटा देऊन योग्य ठिकाणी खर्च करुन विद्यार्थी, कर्मचारी व संस्थेच्या हिताला अधिक महत्व देणार आहोत. हे सर्व करत असताना कोणत्याही शिक्षकावर, प्राध्यापकांवर अन्याय होवू देणार नाही, सर्वांना समान न्याय देऊ. त्याचबरोबर संचालक मंडळ व प्राध्यापकांमध्ये सुसंवाद वाढवून आपले हे मंडळ वैभवाच्या शिखरावर नेऊन महाराष्ट्रामधील उत्तम शैक्षणिक संस्था म्हणून नावारुपास आणू. हिंद सेवा मंडळाच्या निवडणुकीत सर्व शिक्षक, कर्मचारी, मतदारांनी महत्वपूर्ण भुमिका बजावून प्रगती पॅनेलच्या विजयात मोठा हातभार लावला आहे, त्याबद्दल सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे मन:पूर्वक आभार, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे नूतन अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक व कर्मचार्यांच्यावतीने नुकत्याच झालेल्या हिंद सेवा मंडळाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे नूतन अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, सचिव सुनिल रामदासी, प्रगती पॅनेलचे नेते ब्रिजलाल सारडा, संजय जोशी, ऍड.अनंत फडणीस, डॉ.पारस कोठारी, सुजित बेडेकर, मकरंद खेर, अजित बोरा, जगदीश झालानी, रोहिणी शिवलकर, मधुसूदन सारडा, अशोक उपाध्ये, सेवक प्रतिनिधी विठ्ठल उरमुडे, डॉ.राजेंद्र शिंदे, कल्याण लकडे, नवनाथ जंगले, सचिन मुळे, अदिक जोशी आदिंचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या सुजाता काळे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक अर्जुन कांबळे आदिंसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.









