Archive Pages Design$type=blogging

आयुक्तांनी दिल्या अमरधाममध्ये सुविधा देण्याच्या सुचना

नगर- मराठा सेवा संघ प्रणित वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने नालेगाव येथील अमरधाममधील विविध समस्यांबाबत मनपा आयुक्त विलास ...




नगर- मराठा सेवा संघ प्रणित वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने नालेगाव येथील अमरधाममधील विविध समस्यांबाबत मनपा आयुक्त विलास ढगे यांना निवेदन देवुन मनपा कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज कोंडके यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने आयुक्तांना दिलेल्या निवदेनात म्हणटले आहे कि, अमरधाम येथे अनेक समस्या वर्षानू वर्ष प्रलंबित आहेत. वारंवार या समस्या मनपाच्या अधिकार्‍यांना निदर्शनास आणुन देवुनही त्यांनी लक्ष घातले नाही. त्यामुळे मनपाने जर तातडीने अमरधाममधील समस्या दुर करुन तेथे नागरीकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही तर वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेचे असंख्य तरुण रस्त्यावर उतरतील. अमरधाम मध्ये नागरीकांना सातत्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगर शहरासह उपनगरमधुनही अंतयात्रा येथे येत असल्याने बरेच वेळेस दहन ओटे कमी पडतात. त्यामुळे खाली मोकळ्या जागेत अंत्यविधी करावा लागतो. अमरधाम मध्ये रोज सकाळी चार ते सात दशक्रिया विधी होत असतात. त्यावेळी दशक्रिया विधीला येणार्‍या महिला पुरुषांकरता स्नानाची योग व्यवस्था नसल्याने महिलांची मोठी कुचुंबना होत आहे. तरी अमरधाम मध्ये स्वच्छता गृह व स्नानाची व्यवस्था करावी. त्याचबरोबरच दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठी आलेल्या नागरीक आपआपली वाहने रस्त्यावरच उभी करत असल्याने रोज सकाळी मोठ्या प्रणात अमरधाम चौकात वाहतुकीची कोंडी होत असते त्यामुळे शाळा व महाविद्यालयाला जाणार्‍या विद्यार्थ्यांना व र्ऑिेंसला जाणार्‍या नागरीकांना उशिर होत असतो. परिषदेचे कार्यकर्ते अनेकदा हि वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर आयुक्तांनी तातडीने या निवेदनाची दखल घेत अमरधाममधील सर्व समस्यांचा आढावा घेण्याचे सुचना अभियंताना करुन तातडीने आहवाल सादर करण्याचे आदेश दिले. व तातडीने अमरधाममध्ये सुविधांची कामे हाती घेण्यात येण्याचे आश्वासन दिले. या शिष्ठमंडळात अभिषेक बागडे, आकाश बोर्‍हाडे, निलेश पोटे, साई देशपांडे, शुभम पोमने, बबलू दवतरसे, अक्षय पाखरे, अजय कांबळे, अमित भापळे, सचिन वाघ, संतोष सुरसे, शिवदास वांढेकर, अजय गायकवाड, जयश कवडे आदी सहभागी झाले होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: आयुक्तांनी दिल्या अमरधाममध्ये सुविधा देण्याच्या सुचना
आयुक्तांनी दिल्या अमरधाममध्ये सुविधा देण्याच्या सुचना
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjuDr5ZPUoAbmEJbM-6EWfReYm5FeEFt6nvvu3rzREOL2SrLJ7Oj2eQARu1d3ZkfNtfrO10IEcoHc3I99r_RWjsq9i-JxDPJhcA1iXetmf4jIc2iaDG3t3tLkD-lPSaDDfd59X9Xs-FJYks/s320/4+x+6+--7.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjuDr5ZPUoAbmEJbM-6EWfReYm5FeEFt6nvvu3rzREOL2SrLJ7Oj2eQARu1d3ZkfNtfrO10IEcoHc3I99r_RWjsq9i-JxDPJhcA1iXetmf4jIc2iaDG3t3tLkD-lPSaDDfd59X9Xs-FJYks/s72-c/4+x+6+--7.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_509.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_509.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago