नेवासा - युवक काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्या साठी रस्ता रोको आंदोलन केले. पाणी न सोडल्यास नेवासा फाट्यावर चक्का जाम आंद...
नेवासा - युवक काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्या साठी रस्ता रोको आंदोलन केले. पाणी न सोडल्यास नेवासा फाट्यावर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु एक आठवडाभर उलटूनही पाण्याचे आवर्तन सोडले नाही
मुळा धरणातून 1 टिएमसी आवर्तन सोडण्यात यावे यासाठी अ.नगर - औ.बाद हायवेवर नेवासा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
युवक काँग्रेसच्या वतीने दि.26 मार्च रोजी चार मागण्याच मुळा धरणातून नेवासा तालुक्यासाठी 1 टिएमसी आवर्तन पिण्यासाठी पाणी सोडावे बंधारे , गावतळी भरून द्यावे , या मागणीसह जनावरांसाठी त्वरीत चारा छावण्या सुरू करावे , रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावे , शेतकऱ्याला त्वरित कर्ज माफी आणि विज बील माफ करावे , कांद्याला योग्य भाव मिळावा. या मागण्या केलेल्या आहेत.
कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा रस्त्यावर ओतून यावेळी सरकारचा निषेध केला
नेवासा तालुक्याचा धरणाच्या पाण्यावर हक्क असतांनाही तालुक्याला पिण्याच्या पाण्याची आणि जणावरांच्या चारापाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे.
कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा रस्त्यावर ओतून यावेळी सरकारचा निषेध केला
नेवासा तालुक्याचा धरणाच्या पाण्यावर हक्क असतांनाही तालुक्याला पिण्याच्या पाण्याची आणि जणावरांच्या चारापाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे.
या परिस्थितीकडे प्रशासनाने आणि दुर्लक्ष केले आहे , हक्काचे पाणी धरणात असतांना तालुका भिषण पाणीटंचाईने होरपळत असल्याने आज अ.नगर - औ.बाद हायवेवर नेवासा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.
यावेळी रस्ता रोको आंदोलनात शेतकरी , नागरिक , सर्व पक्षांचे कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते










