नेवासा - क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेवासा येथील दारूंटे मळयातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलां...
नेवासा - क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेवासा येथील दारूंटे मळयातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी लोकार्पण करण्यात आली.जयंती उत्सव समितिच्या वतीने जयंती साजरी करून राबवीन्यात आलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाण्याची टाकी व बेसिन पात्र शाळेस लोकार्पण करण्यात आली.जेष्ठ कार्यकर्ते संपतराव दारुंटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी उत्सव समितीचे कल्याण काळे यांनी स्वागत केले.दिनेश व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले.दारुंटेमळा जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती साबळे,अध्यापक संतोष भांबरे,पत्रकार सुधीर चव्हाण यांनी जोतिबा फुलेंचे जीवनकार्य आपल्या भाषणातुन विषद केले.
यावेळी बहुजन समाजाचे युवा नेते संजय सुखधान, उपसरपंच गोरख घुले, राजेंद्र दारुंटे, गणेश दारूंटे, अध्यापक रामदास राजगीरवाड, शंकर व्यवहारे, राम घोलप, अँड.कैलास व्यवहारे, योगेश दांडाईत, संदीप ताठे, कैलास व्यवहारे, यशवंत व्यवहारे, बाळासाहेब दारूंटे, गोरख व्यवहारे, अजय शिंदे, संजय व्यवहारे, दिगंबर व्यवहारे, अरुण शिंदे, मछिंद्र व्यवहारे, दशरथ दारूंटे,सोमनाथ भगत, किरण व्यवहारे यांचेसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संयोजक गणेश व्यवहारे यांनी आभार मानले.










