नगर - संगीत हे जीवन जगताना वेगळाच आनंद देऊन जाते. कुठल्याही क्षणी संगीत ऐकल्यास मन प्रसन्न होते. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना, अ...
नगर - संगीत हे जीवन जगताना वेगळाच आनंद देऊन जाते. कुठल्याही क्षणी संगीत ऐकल्यास मन प्रसन्न होते. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना, अनेक वेळा तणावाचे प्रसंग निर्माण होतात. अशा प्रसंगी प्रसन्न राहण्यासाठी संगीत ऐकल्यास त्याचा परिणाम होतो, आशीर्वाद ग्रुपने शहरात संगीत क्षेत्रात अनेकांना घडविले आहे. व्यावसायिक कलाकारांसारखे हौशी कलाकार आपली कला सादर करीत आहेत. या र्मैफिलीत मला वेगळेच समाधान मिळाले आहे. हा आपण स्वानुभावावरून सांगतो. आशीर्वाद ग्रुपने संगीत क्षेत्राच्या विकासासाठी विविध प्रस्ताव मनपाकडे सादर केले असून, त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
आशीर्वाद ग्रुपच्या वतीने भुतकरवाडी येथे संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर अभिषेक कळमकर बोलत होते. यावेळी श्रीराम तांबोळी, केकती तांबोळी, मंजुषा उपाध्ये, सूर्यकांत सोळसे, संकेत रहाडे, अजय दगडे, शैलेंद्र गांधी, विठ्ठल लोखंडे, डॉ. रूपाली कुलकर्णी, रजनी डावरे, अविनाश कुलकर्णी, नंदकुमार घोडके, आशिष चाबूकस्वार, गणेश मोरे, मनीषा र्निेंाडकर, सुरेश लोळसे, अमोल साबरे, नंदकुमार महाले, वैष्णवी साबळे, सुवर्णा पठारे, डॉ. अभिजीत कुलकर्णी, केदार तांबोळी, सत्यजित सर्रों आदी उपस्थित होते.










