नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदीरामध्ये हिंदू नववर्षाचे (गुढी पाडवा) औचित्य साधून ज्ञानेश्वरी पारायणा सह अखंड हरिनाम सप्ताहास शुक्रवा...
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदीरामध्ये हिंदू नववर्षाचे (गुढी पाडवा) औचित्य साधून ज्ञानेश्वरी पारायणा सह अखंड हरिनाम सप्ताहास शुक्रवार दि.१ एप्रिल पासून उत्साहात प्रारंभ झाला. ज्ञानेश्वरीचे पारायणाने माउलीची भेट होत असल्याने एक तरी ओवीचा अनुभवून जिवनाचे सोने करा असे आवाहन संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख गुरुवर्य हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलतांना केले.
या सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी "पैस"खांबासह ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन हभप शिवाजी महाराज देशमुख व पारायण सोहळयाचे संयोजक हभप नारायण महाराज नजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठ चालक हभप चंद्रकांत महाराज मुळे,हभप मच्छीन्द्र महाराज राउत,हभप सुधीर महाराज चव्हाण आळंदीकर ,जालिंधर गवळी,आदेश टेकाळे,यांचेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्ञानेश्वरी पारायणास बसणाऱ्या भाविकांना मोफत ग्रंथाचे वाटप आन्नासाहेब पवार यांच्या वतीने ज्योती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.नेवाश्याचे भूमीपुत्र हभप नारायण महाराज नजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या पारायण सोहळयामध्ये पहाटे ४ ते ६ काकड़ा भजन, ६.३० ते७ विष्णुसहस्त्रनाम, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ भोजन महाप्रसाद, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायं. ५ते६ हरिपाठ, सायंकाळी ७ते९ हरी कीर्तन, व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहे.
गुढीपाडव्याला शुक्रवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ग्रामगुढीची मिरवनुक व तदनंतर हभप नारायण महाराज नजन यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळयाची सांगता होणार आहे. श्री क्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या प्रांगणात पारायण सोहळा होत असल्याने भाविकांन मध्ये व नेवासकंरान मध्ये उत्साहचे वातावरण निर्माण झाले आहे.










