तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून तालूक्या...
तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून तालूक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पून्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत सविस्तर, राहुरी फॅक्टरी येथे दिनांक 10 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान वाणी मळ्याजवळ फिर्यादी वैभव ऊर्फ भैय्या भाऊसाहेब चव्हाण वय 23 राहणार राहुरी फॅक्टरी व आरोपी विजय हिरामण गव्हाणे राहणार वाणी मळा राहुरी फॅक्टरी या दोघांमध्ये ढंपरचे पैशाचे हिशोबावरून वाद झाला. यावेळी आरोपी विजय गव्हाणे याने फिर्यादी वैभव चव्हाण यास दमदाटी, शिवीगाळ करून लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच गव्हाणे याने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून चव्हाण याच्या उजव्या हाताच्या कोपरावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वैभव चव्हाण यास तातडीने संगमनेर येथील डाॅ. कुटे हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राहुरी पोलिस ठाण्याचे पिएसआय महावीर जाधव यांनी तातडीने संगमनेर येथे वैभव चव्हाण याचा जबाब घेऊन 131/2016 भादंवि कलम 307 आर्मी अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विजय गव्हाणे हा फरार झाला आहे. या घटनेचा तपास पिएसआय महावीर जाधव करीत आहे.









