औरंगाबाद : दीपक गायकवाड आणि सतीश गायके यांनी दाखल केलेल्या याचिकेत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर क...
औरंगाबाद : दीपक गायकवाड आणि सतीश गायके यांनी दाखल केलेल्या याचिकेत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करण्यासंदर्भात शासनाने काढलेली अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.ए.व्ही.निरगुडे व न्या.व्ही.एल. आचलिया यांनी रद्द केली.
म्हटल्यानुसार नेवासा ग्रामपंचायतीची लोकसंख्या 22,500 असून पूर्वी 1 मार्च 2014 मध्ये शासनाने अधिसूचना काढून हरकती मागविल्या होत्या. नंतर 17 नोव्हेंबर 2015 रोजी नेवासा नगर पंचायत म्हणून घोषित केली. तसेच त्याच अधिसूचनेद्वारे नेवासा ग्रामपंचायतीच्या हद्दी वगळून ग्रामपंचायत जिल्हा परिषद क्षेत्रातून वगळण्यात आले होते. त्याच दिवशी नेवाशाच्या तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमले होते.
नेवाशापासून 25 कि.मी. अंतरावर कुठलीही महानगरपालिका नाही. उच्च न्यायालयाने सर्व मुद्यांचा विचार करून वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन हरकती मागविल्या नाहीत, या एकाच मुद्यावर शासनाची कृती बेकायदेशीर ठरविली. तसेच नेवाशाच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करणारा आदेश रद्द केला.
या याचिकेत अर्जदारांतर्फे असा आक्षेप घेण्यात आला की, अधिसूचना आणि हरकतींबाबत कुठल्याही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली नाही. जे कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. तसेच नेवासा येथील जनता ही पूर्णपणे शेती व पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. येथे औद्योगिक वसाहत नाही किंवा इतर आस्थापनांमध्ये नोकरी उपलब्ध नाही. शासनाने कलम 341 च्या तरतुदी विचारात घेतल्या नाहीत.










