नगर - बुर्हाणनगर ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य चांगले काम करीत असून, ग्रामस्थांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न क...
नगर - बुर्हाणनगर ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य चांगले काम करीत असून, ग्रामस्थांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने चांगला विकास साधला असून, अनेक योजनांचा लाभ घेतला आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर गावाचे रूप पालटणार आहे. बुर्हाणनगर देवी मंदिर व इतर परिसराचाही विकासकामांच्या माध्यमातून कायापालट झाला असून, थोडी कामे बाकी आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर संपूर्णपणे गावाचे रूप पालटल्याचे दिसून येईल. गावाला वेगळीच शोभा येऊ शकेल, असे प्रतिपादन पै. संदीप कर्डिले यांनी केले. बुर्हाणनगर ग्रामपंचायतच्या वतीने गावातील अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना श्रीधर पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पै. संदीप कर्डिले बोलत होते.










