पुणे - येथील सहकार नगर पोलीस ठाण्यात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये त्यांनी असे...
पुणे - येथील सहकार नगर पोलीस ठाण्यात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सध्या व्ह़ॉट्स अप, फेसबुक किंवा तत्सम सोशल मिडियावर माझ्या नावाने घाणेरडे मजकूर तसेच अश्लील फोटो अर्थात जे माझे नाहीत असे असे सर्रास प्रसिध्द होत आहे. या माध्यमातून माझे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न होत आहे. या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असून असा मजकूर प्रसिध्द करणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत. सदर तक्रारीची प्रत राज्य गृह मंत्र्यांनाही पाठविल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. सदर तक्रार भूमाता ब्रिगेडच्या लेटरहेडवर हस्तलिखीत स्वरुपात करण्यात आली आहे.










