नगर- शुक्रवाद दि. 15 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता झारेकर गल्ली, तुळजाभवानी मंदिर येथे हनुमान चालिसा पठण आणि भजन संध्येचा कार्यक्रम आयोजि...
नगर- शुक्रवाद दि. 15 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता झारेकर गल्ली, तुळजाभवानी मंदिर येथे हनुमान चालिसा पठण आणि भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सालाबादप्रमाणे रामनवमी दिनी कार्यक्रम करण्याची पंरपरा गेल्या 3 वर्षापासून होत असून नवीपेठ, नेता सुभाष चौक येथील श्रीराम मंदिराच्या श्रीरामभक्त हनुमान सत्संग मंडळाचा हा सवाद्य कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी 10 बाय 30 व्यासपीठ असून त्यावर आकर्षक देखावा असणार आहे. बाल हनुमानाच्या वेषभुषेतील चि.हर्षद अनेचा याचा रामनामाचा जप आणि नृत्यासाठी 10 फूट उंचीवर स्वंतत्र असे वेगळे व्यासपीठ उभारण्यात आले. भाविकांना बसण्याची, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून नगरकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन रामनामाचा जपासह सामुदायिक हनुमान चालिसा पठण आणि भजन संध्येच्या बहारदार कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक विक्रम बनकर यांनी केले आहे.










