रहेमत सुलतान फौंडेशनतर्फे आयेाजित ‘‘सुखन’’ कार्यक्रमात नगर-उर्दु साहित्यातील गजल, कहानी, गद्य, पद्य, कौल, कव्वाली व तीही भारतीय संगीता ...
रहेमत सुलतान फौंडेशनतर्फे आयेाजित ‘‘सुखन’’ कार्यक्रमात नगर-उर्दु साहित्यातील गजल, कहानी, गद्य, पद्य, कौल, कव्वाली व तीही भारतीय संगीता बरोबरची मैफिल जमवली. या मैफिलीत श्रोते त्यांच्या आनंदात मंत्रमुग्ध होऊन जातात व त्यात संकलन, निर्देशन व निवेदक ओम भुतकर यांनी त्यांच्या संकलनाच्या ‘‘ सुखन’’ मधुन व्यक्त केले.
या कार्यक्रमात जयदिप वैद्य, नचिकेत देवस्थाली, देवेंद्र भोगे, शांतनु घुले, मंदार बागडे, मालवीका दिक्षित, महेश तलापे, कुशाल खोत, भैरवी खोत, सुधीर फडतरे यांनी रसिकांना तीन तास गजल , कव्वालीच्या रसात अक्षरश धुंद करुन ठेवले.
सुरुवातीला भारत पाक यांच्या संबंधावर जयदिप यांनी एक सुंदर कवितेने सुरुवात केली. यानंतर ओम भतकर यांनी कथाकार पद्मश्री मुज्तबा हुसेन यांची कथा सादर करतांना उर्दू साहित्यकरांच्या कथा कादंबर्यांची आत्मकथा सादर करुन लेखकांचे दू:ख मांडतांना श्रोत्यांना हसवत हसवत त्यांनी अंतर्मुख केले.









