महाराष्ट्र चॉकबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य क्रीडा फोरम व अ.नगर जिल्हा चॉकबॉल संघटनेच्या वतीने जिल्हा क्रिडा संकुल अ.नगर येथे राज्यस्तरी...
महाराष्ट्र चॉकबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य क्रीडा फोरम व अ.नगर जिल्हा चॉकबॉल संघटनेच्या वतीने जिल्हा क्रिडा संकुल अ.नगर येथे राज्यस्तरीय चॉकबॉल प्रशिक्षण शिबीराचे आय़ोजन करण्यात आले. या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्य चॉकबॉल संघटनेचे सचिव मा.सुरेश गांधी, सुधीर काळे, दादासाहेब दुसुंगे, बाळू बोडखे, सुभाष नरवडे, दादासाहेब खेडकर, रमाकांत दरेकर, गोरक्षनाथ रेपाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हे प्रशिक्षण तीन दिवस चालणार असल्याची माहिती जिल्हा सचिव राजेंद्र कोतकर यांनी दिली. या शिबीरासाठी महाराष्ट्राछ्या विविध जिल्ह्यातून 40 खेळाडू सहभागी झाले होते.










