नगर- गजराज नगर येथील तरुणांनी एकत्र येऊन या भागातील अनेक प्रश्न सोडवली. सुर्यपुत्र प्रतिष्ठानची स्थापना करुन याच्या माध्यमातून सामा...
नगर- गजराज नगर येथील तरुणांनी एकत्र येऊन या भागातील अनेक प्रश्न सोडवली. सुर्यपुत्र प्रतिष्ठानची स्थापना करुन याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन अक्षय कर्डीले यांनी केले. गजराज नगर येथे अनेक तरुण एकत्र येवुन सुर्यपुत्र प्रतिष्ठानची स्थापना केली. यावेळी प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण अक्षय कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष बबलू सुर्यवंशी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता ताकपिरे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण, विवेक त्रिंबके, सर्जेराव आठवले, राजु ठाणगे, विशाल सुर्यवंशी, शक्ती कांबळे, अक्षय सकट, राजु गाडे, नितीन कांबळे, संतोष आठवले, सचिन दुसूंगे, दिपक शिनगारे, राकेश शिनगारे आदि उपस्थित होते.










