नगर- भिंगार भाजपा मंडलाच्यावतीने येथील देशमुख सांस्कृतिक हॉल येथे भारतीय जनता पक्षाचा 36 वा स्थापना दिवस साजरा करतांना यामध्ये शिवजयं...
नगर- भिंगार भाजपा मंडलाच्यावतीने येथील देशमुख सांस्कृतिक हॉल येथे भारतीय जनता पक्षाचा 36 वा स्थापना दिवस साजरा करतांना यामध्ये शिवजयंती उत्सव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील वीरमाता व वीरपुत्र यांचा सन्मान करण्यात आला. या वेगळ्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
भाजपा नेते ऍड.अभय आगरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ नेते मधुसूदन मुळे, प्रदेश सरचिटणीस अशोक कानडे, नगर पंचायत समिती उपसभापती शरद झोडगे, शहर जिल्हा उपाध्यक्ष दामोधर माखिजा, ज्येष्ठ नेते नरेंद्र कुलकर्णी, कॅन्टोंमेंट भाजपाच्यानगरसेविका शुभांगी साठे, केडगाव भाजप मंडल अध्यक्ष साहेबराव विधाते, सावेडी मंडल सरचिटणीस मुकुल गंधे, सुनिल कुलकर्णी, वैभव जोशी, शिवसेनेचे भिंगार प्रमुख सुनिल लालबोंद्रे, रिपाई युवा आघाडी अध्यक्ष अमित काळे, नागरदेवळेचे ग्रा.पं.सदस्य रोहित भुजबळ आदि प्रमुख अतिथी उपस्थित होते.









