नगर - आघाडी सरकारच्या काळात राज्यातील 35 पैकी 28 जिल्ह्यांतील सामाजिक न्याय भवनांना मंजुरी मिळाली. आता नगर जिल्ह्यातही भारतरत्न डॉ.बा...
नगर - आघाडी सरकारच्या काळात राज्यातील 35 पैकी 28 जिल्ह्यांतील सामाजिक न्याय भवनांना मंजुरी मिळाली. आता नगर जिल्ह्यातही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा मार्ग मोकळा झाला असून, भनवासाठी राज्य सरकारने 13 कोटी 94 लाखांचा निधी मंजूर केला असून समाजकल्याण विभागाच्या नगर कार्य़ालयाचे सहा.आयुक्त या संदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून प्राप्त झाला आहे. आबंडेकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या या अध्यादेशामुळे आंबेडकरी चळवळीत कार्य़कर्त्यांत आनंदाचे वातारवरण आहे.
सावेडी जुने बसस्थानक येथील जागेत ही इमारत उभी राहील. दोन मजली ही इमारत असेल. त्यासाठी 8 कोटी 12 लाखांची व विद्युतीकरणासाठी 70 लाख रुपयांची तरतूद आहे. पाणीपुरवठ्यासाठी 24.5 लाख, संरक्षक भिंतीसाठी 40 लाख, इमारती भोवतालच्या रस्त्यांसाठी 49 लाख, फर्निचरसाठी 1 कोटी 75 लाख, बगीचा व पार्किंगसाठी प्रत्येकी 25 लाख, इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग राहणार असून, त्यासाठी 20 लाख, आग प्रतिबंधकसाठी 25 लाख व उर्वरित कामांसाठी 1 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
2008 मध्ये या भवनासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.पी.अन्बलगन यांनी प्रयत्न केले. जागा निश्चितीपासून ते निधी मिळविण्यापर्य़ंत मोठा संघर्ष करावा लागला. डॉ.पी.अन्बलगन व माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांच्या प्रय़त्नातून जागेचा प्रश्न सुटला. माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे हे जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांना सावेडीची जागा दाखविण्यात आली. त्यांनी जागा पाहिली त्यावेळी डॉ.पी.अन्बलगन, मुन्शी, समाजकल्याण विभागाचे निरीक्षक बाबासाहेब देवारे उपस्थित होते. हंडोरे यांनी दौऱ्यापश्चात तिसऱ्या दिवशी जागेसाठी 3 कोटी 88 लाखांचा निधी मंजूर केला. एसटी महामंडळाने हा निधी वर्ग करुन समाजकल्याण विभागाने जागेचा ताबा घेतला.










