पारनेर - उन्हाची तमा न बाळगता पारनेर तालुक्यातील पळवे परिसर जत्रांच्या गर्दीने फुलला आहे. पळवे खुर्द व बुद्रूक, नारायणगव्हाण, वाडेगव्ह...
पारनेर - उन्हाची तमा न बाळगता पारनेर तालुक्यातील पळवे परिसर जत्रांच्या गर्दीने फुलला आहे. पळवे खुर्द व बुद्रूक, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, पानोली येथील जत्रांना विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ झाला.
जातेगाव येथे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात येते. देवासमोर पाच गावच्या काठय़ा, पालख्यांची भेट होते. रवनाथाला रामनवमीच्या दिवशी तेल लावण्याची प्रथा आहे. २२ एप्रिलपासून एकेका गावाच्या यात्रांना प्रारंभ होतो. राहुगाव येथून कावडीने पाणी आणून पूजा केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी पळवे बुद्रूक येथील यात्रौत्सव पार पडला. गुरुवारी रात्री पालखीची मिरवणूक काढण्यात आली. देवाला तेल लावल्यानंतर नांगरणी न करणे, दाढी न करणे, मांसाहार न करणे या परंपरा गावात जपल्या जातात. २४
एप्रिल रोजी पळवे खुर्द येथील यात्रौत्सव आहे.










