मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांच्या वजनापेक्षा जास्त ओझे असल्याने ते पेलतांना विद्यार्थ्यांची दमछाक होते. हे ओझे कमी करण्यास...
मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांच्या वजनापेक्षा जास्त ओझे असल्याने ते पेलतांना विद्यार्थ्यांची दमछाक होते. हे ओझे कमी करण्यासंदर्भातील याचिका राज्यसरकारने उच्च न्यायालयाकडे केली होती आणि विशेष म्हणजे जारी केलेली अधिसूचना ही केवळ अनुदानित शाळांपुरतीच मर्य़ादित न राहता सीबीएससी, आयसीएससी, आयबी इत्यादी बोर्डांच्या शाळांनाही लागू होईल, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. मात्र या अधिसूचनेवर शाळा अंमलबजावणी करतात की नाही, हे पाहण्यासाठी सरकारकडे यंत्रणा नसल्याने उच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली.
राज्य सरकारला विद्यार्थ्यांचे शाळेचे वेळापत्रक बदलण्याचे आदेश द्यावेत. तसेच शाळेत लॉकर पद्धत सुरू करावी आणि ई-लर्निंग पद्धतीचा वापर करावा, अशी मागणी चेंबूरच्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.










