नगर- वन बचाव - वन्य जीव बचाव असा नारा देत उदयपुर येथील 6 युवक 7 एप्रिल पासून संपूर्ण भारतभर जनजागृती करत भ्रमण करीत आहेत. पदमसिंह...
नगर- वन बचाव - वन्य जीव बचाव असा नारा देत उदयपुर येथील 6 युवक 7 एप्रिल पासून संपूर्ण भारतभर जनजागृती करत भ्रमण करीत आहेत. पदमसिंह राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरज राठोड, अरविंद सिंग, प्रोज सिंग, हितेश सालनी, पिट्टू गर्गे अशी या युवकांची नावे असून, काल हे युवक नगर येथे आले असता, निसर्गप्रेमी हर्षद कटारिया, भावेश परमार व चारुदत्त परमार यांनी या सर्वांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती घेतली.पदमसिंह राठोड यांनी याप्रसंगी बोलताना सांगितली की, वाईल्ड ऍण्ड स्ट्रीट ऍनिमल रेस्क्यु सोसायटी या नावाने यांची र्ेर्ंम रजिस्टर असून, या संघटनेचे 70 सदस्य आहेत. गेल्या 13 वर्षांपासून वन बचाव व वन्य जीव बचाव या संदर्भात आम्ही सर्व कार्य करत असून, अडचणीत आलेल्या श्वापद तसेच चुकून रस्त्यावर आलेली जनावरे अशा 47 हजारांवर प्राण्यांची त्यांनी आजपर्यंत पकडून परत
निसर्गमुक्त केले आहे. उदयपुर जवळील 5 जिल्ह्यात जवळपास 357 कि.मी. परिसरात त्यांचे कार्य सुरु असून, संपूर्ण भारतभर या मोहिमेविषयी जनजागृती वाढावी, त्याचबरोबर पर्यावरणाचा संदेशही समाजापर्यंत पोहचवावा, या दृष्टीकोनातून जवळपासून एक महिनाभर हे युवक भारतभर भ्रमण करीत आहेत. विशेषत: या भारत भ्रमणामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांना व तालुक्यांना भेट देत आहेत, तेथे त्यांनी या संस्थेचे कार्य, सर्व प्राण्यांना पकडण्याची पद्धती, त्यांच्याविषयी असलेले अनुभव व त्यात आपण कशापद्धतीने सुधारणा करु शकतो. या विषयी ते सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी मगर, तरस, बिबटे, निलगाय, किंगकोब्रा, घोरपड बाकी अनेक प्राणी पकडून त्यांना निसर्गमुक्त केले आहे. कोणताही हिंस्त्र प्राणी किंवा इतर प्राणी पकडल्यानंतर त्यांना लवकरात लवकर निसर्गमुक्त केले तर ते शांतपणे निघुन जातात, परंतु हेच प्राणी जास्ती दिवस डांबून ठेवले तर ते रागीट होतात. जंगलात सोडल्यानंतरही इतर प्राण्यांवर अथवा दिसेल त्यांच्यावर हल्ला करतात. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर निसर्गमुक्त केले तर ते शांतपणे निघून जातात व इतरांचेही प्राण सुरक्षित राहतात. या गोष्टी जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे, यास चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, वनविभागाचेही चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरमधील निसर्गप्रेमी हर्षद कटारिया, भावेश परमानर व चारुदत्त परमान हे लवकरच या संघटनेची शाखा अहमदनगरमध्ये सुरु करणार असून, त्यांना सर्व नागरिकांनी व वनविभागाने सहकार्य करावे, असे आवाहनही पदमसिंह राठोड यांनी याप्रसंगी केले.









