नगर - मजले चिंचोली (ता. नगर) येथे ‘ग्रामोदय ते भारतोदय’ या कार्यक्रमांतर्गत जलदिंडी अभियानाद्वारे थेट गावापर्यंत सर्व शासकीय योजना पोहो...
नगर - मजले चिंचोली (ता. नगर) येथे ‘ग्रामोदय ते भारतोदय’ या कार्यक्रमांतर्गत जलदिंडी अभियानाद्वारे थेट गावापर्यंत सर्व शासकीय योजना पोहोचविण्याच्या दृष्टीने ग्रामसभा संपन्न झाली. निसर्गाने दिले ते केवळ ओरबाडले, तर चिरस्थायी प्रगती कशी साध्य होणार. शेतजमीन ही काळी आई आहे. पाणी हा नवनिर्मितीचा संजीवक स्त्रोत आहे. या दोन मूलभूत जीवनस्त्रोतांचे नुकसान केले, तर समृद्धी कशी येणार, असा सवाल करीत जलयुक्तसारख्या योजनांचा स्वीकार मनपूर्वक करा. योजनांच्या अंमलबजावणीचे यश हे ग्रामसभेवर व गावकर्यांवरच अवलंबून आहे. प्रत्येक कामाबाबत जागरूकता असायलाच हवी, तरच योजनांचा उद्देश साध्य होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, ता.कृ.अ. बाळासाहेब नितनवरे, उपसरंपच धर्मनाथ आव्हाड, बी. वाय. आव्हाड, नारायण आव्हाड, गंगाधर आव्हाड, संदीप पालवे, विष्णू आव्हाड, भगवान आव्हाड, हरिदास कदम, बाळासाहेब आव्हाड, ऍड. ज्ञानेश्वर आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गाव सुदृढ झाले तर देश सुदृढ होईल. आपली अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान लाभदायी सिद्ध होईल. गावात होणार्या कामाचे उत्कृष्ट नियोजन करताना विकासाच्या कामात गावकर्यांनी पुढाकार घ्यावा, भूजल पातळी वाढविण्याबरोबरच पाणी वापराचे नियोजनही करणे ही काळाची गरज आहे असे प्रास्ताविकात बोलतांना श्री. बऱ्हाटे म्हणाले.









