अहमदनगर - जिल्ह्यातील समाजसेवक अॅड.कारभारी गवळी हे हायकोर्टाचे 'वकील' असले तरी श्री.शनिदेव हे या सृष्टीचे 'न्यायाधिश...
अहमदनगर - जिल्ह्यातील समाजसेवक अॅड.कारभारी गवळी हे हायकोर्टाचे 'वकील' असले तरी श्री.शनिदेव हे या सृष्टीचे 'न्यायाधिश' आहेत. याचे भान त्यांनी ठेवावे असे मानवी हक्क अभियानाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी सुचित केले आहे.
ब्लॅक गॅझेट प्रसिध्द करुन शनीशिंगणापूरचे नागापूर मनु-शिंगणापूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. त्यांचा जाहिर निषेध करण्यात येत आहे. प्रथम अॅड.गवळी यांनी येत्या अमावस्येला सपत्निक शनीदेवाच्या दर्शनाला जावून दर्शन घ्यावे, त्यांचा आम्ही दि्ल्लीगेट येथे जाहिर सत्कार करु. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्येच 'मनु' वादाला तिलांजली दिली आहे. राज्यघटनाच देशाला 'पुरक' आहे आणि ही भूमि 'सहिष्णूता' मानते त्यामुळे मनु-कायदा राबविला जातो ही बाब राजकारणाला खतपाणी घालणारी वाटते.










