नगर- विशेष उपक्रम राबविण्यात नगर शहरातील दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीमध्ये एकदंत मित्र मंडळ अग्रेसर आहे. दरवर्षी या मंडळातर्फे हमुमान ...
नगर- विशेष उपक्रम राबविण्यात नगर शहरातील दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीमध्ये एकदंत मित्र मंडळ अग्रेसर आहे. दरवर्षी या मंडळातर्फे हमुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. याही वर्षी या मंडळाने मानवसेवेबरोबरच पशुपक्षींची सेवा महत्वाची समजून कॉलनीतील प्रत्येक घराच्या गच्चीवर पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी लागणार्या भांड्याचे वाटप करुन एक वेगळा उपक्रम राबविला. सुमारे 70 ते 100 भांडे वाटप करुन एकंदत मंडळाने ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांना थंड पाणी मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला.
याप्रसंगी मंडळाचे किसन गाजेंगी, ओंकार बुरगुल, स्वप्नील सग्गम, आकाश सिरसुल, राज सुरम, गणेश नागूल, विनित इराबत्तीन, आकाश हरबा, प्रथमेश चाटला, संतोष चेन्नुर, अजय इराबत्तीन, अमोल गाजेंगी, पुरुषोत्तम बेत्ती, राजेश मेरगू, सागर गाजेंगी, उमेश सुंकी, नरेश मेरगू,ऋषीकेश इराबत्तीन, श्रीनिवास बुरगूल, वंदना इराबत्तीन, सुरेखा कोडम, सौ.गाजेंगी, श्रीमती नागूल, सौ.सिरसुल आदीसह नागरीक उपस्थित होते.









