नगर - मंगळवार (दि. 12 एप्रिल) रोजी केडगाव येथील वृत्तपत्र विक्रेते विजय प्रभाकर ठाकूर यांचे अल्पशा आजाराने रोजी निधन झाले. ते 60 वर्षा...
नगर - मंगळवार (दि. 12 एप्रिल) रोजी केडगाव येथील वृत्तपत्र विक्रेते विजय प्रभाकर ठाकूर यांचे अल्पशा आजाराने रोजी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या 30 वर्षांपासून ते वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत होते. स्व. ठाकूर हे धार्मिक वृत्तीचे व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचा परिसरात मोठा परिवार होता. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. वृत्तपत्र विक्रेता जयदीप ठाकूर यांचे ते वडील होते. त्यांच्यावर केडगाव येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या समयी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.










