पारनेर - तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत ओली पार्टी झाल्याची घटना दि. १९ रोजी घडली आहे. या घटनेची पारनेरसह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू...
पारनेर - तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत ओली पार्टी झाल्याची घटना दि. १९ रोजी घडली आहे. या घटनेची पारनेरसह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्यास कुठलीही हालचाल केलेली नाही. जेव्हा तक्रार येईल, तेव्हा कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.दि. १८ रोजी पारनेर तालुक्यातील एका गावात यात्रा होती. या यात्रेनिमित्ताने त्याच गावातील परंतु राहुरी तालुक्यातील एका शाळेत सेवेत असलेल्या शिक्षकांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांना ओली पार्टी दिली. विशेष म्हणजे ही ओली पार्टी घरी न देता शाळेच्या आवारात दिली. दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेली ही पार्टी रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होती. साऊंडसिस्टीम व विजेच्या झगमगटात रंगलेल्या पार्टी बहरात आली होती. शाळेच्या आवारात विजेच्या झगमगाट व गाणे ऐकू येत असल्याने शाळेत नेमका काय कार्यक्रम सुरू आहे, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली. काहींनी थेट शाळेत जाऊन पाहणी केली असता तेथे राहुरी तालुक्यातील शिक्षण विभागातील एक वरिष्ठ अधिकारी व शिक्षक संघटनेचा नेते मद्यधुंद अवस्थेत दिसून आले. ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्याची चाहूल लागताच पार्टी अर्ध्यावर सोडून पळून जाण्याची वेळ संबंधितांवर आली. मात्र या पार्टीचे वृतसर्वत्र दैनिकांत प्र सध्द ाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पारनेर पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग याबाबत अनभिज्ञ आहे. नेमके काय झाले, याची माहिती अद्यापही शिक्षण विभागाला नसल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार आंधळ दळतंय.. अशीच झालेली आहे.










