श्रीगोंदा - गेली ३५ वर्षे आश्गावासनाचे जर दाखवून तालुक्याचे वाळवंट केले तर राज्यातील युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रम...

श्रीगोंदा - गेली ३५ वर्षे आश्गावासनाचे जर दाखवून तालुक्याचे वाळवंट केले तर राज्यातील युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच बोलण्यात पटाईत असून, त्यांना शेतक-यांसाठी जनावरांच्या छावण्या, पिण्याचे पाणी, यासाठी कोणतीच कृती करावयाची नाही, अशी टीका आ. राहुल जगताप यांनी करून येत्या आठवड्यात जनावरांच्या छावण्या, तलावात पिण्याचे पाणी आदी मागण्या पूर्ण न झाल्यास दि. ३0 एप्रिल रोजी पूर्वसूचना न देता तहसील कार्यालयात जनावरांसह धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. तालुक्यातील घारगाव येथे नगर-दौण्ड राजमार्गावर काल सोमवारी आ.जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनावरांच्या छावण्या, पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ३५ वर्षांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. सध्या दुष्काळ असल्याने तालुक्यातील सर्व तलाव भरून घेण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र्, सरकारने फक्त ७ तलावांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. इतर तलावांत पणी सोडण्याचा आपण प्रयत्न करीत दि. २९ पर्यंत आमच्या मागण्या मान्य न केल्यास दि. ३0 रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता तहसील कार्यालयात ज़नावरांसह धरणे आंदोलन करण्यात येईल. या वेळी बोलताना बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी सरकार व जिल्हाधिकारी कार्यालयावर टीका करताना जिल्हाधिकारी कार्यालय तर श्रीगोंद्याच्या पाण्यासाठी शाप ठरले असून, सहा महिन्यांपूर्वी पाच दिवस उपोषण करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगून चालू आवर्तनात श्रीगोंद्यातील सात तलवा तर पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील यादी बाहेरील तलाव भरून घेण्याचा प्रयत्न करून श्रीगोंद्यावर अन्याय करणार असल्याचे सिध्द केले आहे. शेतकरी व जनवारांचे हाल पाहता एकत्र येऊन तीव्र आंदोलनाशिवाय पर्पाय नसल्याचे सांगितले. या वेळी अण्णासाहेब शेलार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, ऋषिकेश गायकवाड, निंभोरे मेजर यांची भाषणे झाली. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.









