नगर- शहरातील अशोकभाऊ फिरोदिया मेरीट फाऊंडेशन व्दारा आयोजित गणित परिक्षेत वसंत टेकटी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीनाथ विद...
नगर- शहरातील अशोकभाऊ फिरोदिया मेरीट फाऊंडेशन व्दारा आयोजित गणित परिक्षेत वसंत टेकटी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीनाथ विद्यालयाचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असुन सेमी इयत्ता 1 ली चा सुदर्शन वाकसे हा विद्यार्थी शहर गुणवत्ता यादित 50 पैकी 46 गुण मिळवून चौथा आला. तर इयत्ता 2 री सेमी चा विद्यार्थी निरंजन लगड हा देखील 50 पैकी 46 गुण मिळवून चौथा आला आहे. चि.सुदर्शन याला सौ.एस.एस.शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले तर चि.निरंजनला सौ.ए.जी.चक्राल यांचे मार्गदर्शन लाभले.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे सेवा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष विनय पाऊलबुद्धे, सक्रेटरी शंकरराव मंगलारम, पदाधिकारी, सदस्य यांनी कौतुक केले. तर मुख्याधापिका सौ.ए.बी.सिद्दम शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोघांचे अभिनंदन केले.










