अहमदनगर - संत शिरोमणी नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळ कोथरुड पुणे यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी नगर शहर लाड ...
अहमदनगर - संत शिरोमणी नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळ कोथरुड पुणे यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी नगर शहर लाड सुवर्णकार समाजाचा विशेष पुढाकार देऊन गौरव करण्यात आले. गेली 25 वर्ष समाजामध्ये संघटन, उपक्रम, समाज उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक संघटनाचा याप्रसंगी गौरव करण्यात आला. माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या हस्ते व कोथरुड शाखेचे अध्यक्ष माधवराव दहीवाळ यांच्या हस्ते नगरच्या लाड सुवर्णकार समाजाचे विश्वस्त श्री प्रकाश देवळालीकर यांनी हा गौरव स्विकारला.
यावेळी विश्वस्त मुकुंद देवळालीकर यांनी भविष्यातील विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. बैठकीत समाजाचे विश्वस्त जगदिश देडगांवकर, विनायक नांदुरकर, भिमराव अंबिलवादे, शाम मुंडलिक, सचिन देवळालीकर, विजय हिंगणगांवकर, सुरेश मैड, मार्गदर्शक राजेंद्र मिसाळ, किशोर शहरकर, रविंद्र पटवेकर व सदस्य उपस्थित होते.










