नेवासा - घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवराच्या हस...
नेवासा - घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवराच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच संदिप कुऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य सुनिलभाऊ गडाख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश येळवंडे अन्य मान्यवराच्या यांच्या हस्ते डिजीटल क्लास रूमचे उद्घाटन करण्यात आले.
लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होता. वेगवेगळ्या गाण्याची नृत्य सादर करण्यात आले. त्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत मुले व मुली नृत्यात मध्ये सहभाग घेतला तर पालकांनी टाळ्या वाजवून, बक्षिसे दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच संदिप कुऱ्हाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुनिलभाऊ गडाख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश येळवंडे, उप मुख्याध्यापक सिताराम आव्हाड, अशोकराव येळवंडे, नानासाहेब रेपाळे, बाळासाहेब सोनवणे, दत्तात्रय कुऱ्हाडे, जनार्धन सोनवणे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, किशोर लोंढे, संतोष सोनवणे, खंडु वैरागर तसेच पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते, तर यावेळी प्रमुख पाहुण्याचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला .










