नगर- राम नवमी उत्सव साध्यापद्धतीने साजरा करून त्याची वर्गणी नाम फाऊंडेनशला देणार आहे. महापौर अभिषेक कळमकर व आमदार संग्राम जगताप यांच्य...
नगर- राम नवमी उत्सव साध्यापद्धतीने साजरा करून त्याची वर्गणी नाम फाऊंडेनशला देणार आहे. महापौर अभिषेक कळमकर व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नामचे संचालक मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे किशोर वाने व अजित शहाणे यांनी सांगितले.उपनगरातील वसंत टेकडी जवळील दसरेनगर परिसरातील स्वराज प्रतिष्ठानतर्फे राम नवमीनिमित्त होणार खर्च टाळून दुष्काळ व आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुबिंयांना मदत करणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी ६ वाजता हाअभिषेक, अकरा वाजता महिलांचा भजनांचा कार्यक्रम, बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव, सायंकाळी साडेपाच वाजता बाबा ढवळे महाराज यांचे प्रवचन होईल. प्रसाद वाटप रात्री आठ वाजता होईल.










