नगर- नगर-औंरगाबाद रोडवरील बुऱ्हाणनगर ग्रा.पं.हद्दीतील गजराज नगरला परदेशी राजपुत समाज प्रतिष्ठानची स्थापना आ.शिवाजीराव कर्डीले यांच्या...
नगर- नगर-औंरगाबाद रोडवरील बुऱ्हाणनगर ग्रा.पं.हद्दीतील गजराज नगरला परदेशी राजपुत समाज प्रतिष्ठानची स्थापना आ.शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करुन करण्यात आली. गजराजनगर स्थापने पासून हा समाज येथे वास्तव करीत आहे. या समाजातील लोक पूर्वीपासूनच आपल्या पाठीशी आहेत. त्यांचे प्रश्न,समस्या, अडी-अडचणीत आपण सदैव त्यांच्या मागे आहोत असे प्रतिपादन आ.कर्डीले यांनी यावेळी केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाजाने चांगले काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी या समाजाला केले.
यावेळी परदेशी ठाकुर राजपुत समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय चौहान, उपाध्यक्ष मनोहर परदेशी सचिव आनंद परदेशी, किरण परदेशी, अनिल परदेशी, राजेंद्र जैसवाल, छोटू परदेशी, संतोष चौहान, प्रिया परदेशी, छाया परदेशी, सपना परदेशी, मंजू परदेशी, शोभा परदेशी, रेखा परदेशी, लक्ष्मी चौहान, कमलाबाई परदेशी, गोपाळ परदेशी, चंद्रपाल परदेशी, आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.










