नगर - ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकर्यांसाठी झिजावले व बहुजन समाजाला ताठ मानेने जगण्याचे शिकविले, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिब...
नगर - ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकर्यांसाठी झिजावले व बहुजन समाजाला ताठ मानेने जगण्याचे शिकविले, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार कायम स्मरणात ठेवले पाहिजे. प्रस्तापित समाज व्यवस्थेला प्रखर विरोध करुन गुलागिरीचे जीवन जगणार्या व शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला जागृत करुन त्यांना समानता मिळवून देण्याचे महान कार्य केले, असे प्रतिपादन छबुनाना जाधव यांनी केले.
थोर क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त संत सावता माळी उत्सव समितीच्यावतीने मध्यरात्री 12 वाजता स्वच्छता अभियान करुन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष छबु नाना जाधव, सुनिल राऊत, राजेंद्र फुलसौंदर, शिवाजी जाधव, दत्ता बनकर, मंदार सटाणकर, सतिष डागवाले, बाबा पटवेकर, पप्पु महानोर, धनंजय पालवे, माणिक बनकर, बाळु पुंड, सुभाष डागवाले, नितिन शेरकर, अजय पटवेकर, सुभाष सांगळे, प्रविण कानडे, अनिल साबळे, फारुक शेख आदि उपस्थित होते.









