नगर - मराठी चित्रपटाला मॉलमध्ये स्थान मिळत नाही. मराठी चित्रपटाला प्रतिनिधित्व देण्याचे काम वेदान्त टॉवरच्या इमारतीच्या माध्यमातून होईल,...
नगर - मराठी चित्रपटाला मॉलमध्ये स्थान मिळत नाही. मराठी चित्रपटाला प्रतिनिधित्व देण्याचे काम वेदान्त टॉवरच्या इमारतीच्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा आहे. टॉवरचे संचालक अनिल जोशी स्वतः चित्रपट निर्माते असून, मराठी चित्रपटांसाठी ते मोठे योगदान देऊन चांगली भूमिका पार पाडतील, असा विश्वास अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी व्यक्त केला.सर्जेपुरा येथील वेदान्त टॉवर मल्टीप्लेस व शॉपिंग मॉलच्या बांधकामास अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सदिच्छा भेट दिली असता, त्यांचे टॉवरचे संचालक, चित्रपट निर्माते अनिल जोशी यांनी स्वागत केलै. यावेळी पाटकर बोलत होते. याप्रसंगी इंजि. विनोद काकडे, अमोल खोले, सातपुते सर, राम वडागळे, इंजि. विनोद काकडे, सुधाकर भुसारे उपस्थित होते.










