नगर- शासकीय तंत्रनिकेतनमधील यंत्र विभागाचे अधिव्याख्याता प्रा.दादासाहेब करंजुले यांना केडगाव येथील हरि हरिश्वेर ग्रामविकास प्रतिष्ठानचा...
नगर- शासकीय तंत्रनिकेतनमधील यंत्र विभागाचे अधिव्याख्याता प्रा.दादासाहेब करंजुले यांना केडगाव येथील हरि हरिश्वेर ग्रामविकास प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.यापूर्वीही शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे प्रा. करंजुले यांना प्रॉमिसिंग इंजिनइर, क्षितीज वेध समाजभूषण सावित्री ज्योती, शैक्षणिक कार्य गौरव, राष्ट्रीय प्रतिभारत्न आणि पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते माजी आमदार अनिलभैय्या राठोड, जय भगवानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, डॉ.शालिनीताई कराड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.अमोल बागूल यांनी सुत्रसंचालन केले तर हरिहरिश्वेर ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत चेमटे यांनी आभार मानले.









