अहमदनगर : जिल्ह्यात सलग तीन वर्षापासून शौचालय उभारणीच्या कामगिरीत अहमदनगर अव्वल आहे. तीन वर्षात राज्यात १ लाख ११ हजार ४७५ शौचालय उभा...
अहमदनगर : जिल्ह्यात सलग तीन वर्षापासून शौचालय उभारणीच्या कामगिरीत अहमदनगर अव्वल आहे. तीन वर्षात राज्यात १ लाख ११ हजार ४७५ शौचालय उभारण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षात राज्याच्या उद्दिष्टात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक शौचालय बांधण्यात आलेले आहेत. हमदनगरनंतर राज्यात चालू वर्षात शौचालय उभारणीत रत्नागिरी दुसर्या स्थानावर, तर वर्षाच्या कामगिरीत नांदेड जिल्हा दुसर्या स्थानावर आहे.
जिल्ह्यात २0१५-१६ या आर्थिक वर्षात ४७ हजार ६0 शौचालय बांधण्यात आलेली आहेत. राज्यात नगर नंतर चालू आर्थिक वर्षात रत्नागिरी, नांदेड, नाशिक, कोल्हापूर, यवतमाळ, बीड, सोलापूर, पुणे, धुळे, जळगाव यांचा समावेश आहे. राज्यात सर्वात शेवटी हिंगोली असून त्या ठिकाणी चालू वर्षात अवघी ७ हजार २५२ शौचालय उभारण्यात आलेली आहेत.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत १२ हजार रुपये अनुदान देवून शौचालय बांधण्यात येत आहे. जिल्ह्यातील ६ लाख ७१ हजार ८६८ कुटुंबापैकी २ लाख ८ हजार कुटुंबांकडे शौचालय नाहीत. सध्या ४ लाख ६३ हजार कुटुंबांकडून शौचालयाचा वापर करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांच्या नेतृत्वाखाली शौचालय बांधण्यात येत आहे. यासाठी आधी बेस लाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात शौचालय उभारण्यात येत आहेत.










