नगर- संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या नगर शाखेच्या वतीने निरंकारी मंडळाचे भूतपूर्व सद्गुरु बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या 36 व्या स...
नगर- संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या नगर शाखेच्या वतीने निरंकारी मंडळाचे भूतपूर्व सद्गुरु बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या 36 व्या स्मृती दिवस निमीत्त मिस्कीनरोड, जॉगिंग पार्क समोरील निरंकारी भवन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबीरात 172 रक्तदात्यांनी स्वंयस्फुतीने येऊन रक्तदान केले यात 22 महिलांनीही पुढे येऊन रक्तदान केले. तसेच अनेक महिलांना इच्छा असून ही पुरेसा हिमोग्लोबिन नसल्यामुळे रक्तदान करता आले नाही.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन आदर्शगाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष श्री.पोपटराव पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप कळमकर होते.तसेच या प्रसंगी मा.आमदार संग्राम भैय्या जगताप, महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब गायकवाड, श्री.दामोदर बठेजा, ठाकुरदास नवलानी, श्री.सुंदरानी, श्री.लालुशेठ मध्यान, श्री.अशोकजी आहुजा (पुणे) आदि मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचा मंडळाचे झोनल इंचार्ज हरीशजी खुबचंदानी यांनी स्वागत केले व त्यांना निरंकारी प्रकाशन साहित्य भेट देवुन सत्कार ही केले.
मान्यवरांपैंकी श्री.पोपटराव पवार, श्री.संग्रामभैय्या जगताप, व डॉ.संदीप कळमकर यांनी मनोगत व्यक्त केले. व निरंकारी मिशन च्या अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले व अशा उपक्रमांचे सगळीकडे अनुसरण होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले व मंडळाच्या भावी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
निरंकारी मंडळाच्या नगर शाखेतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे यंदाचे 21 वे वर्ष होते व निरंकारी मिशन तर्फे वर्षभर देशात वेगवेगळ्या ठिकाणी साखळीबद्ध पद्धतीने रक्तदान शिबीरांची मालिका सुरु असते. यात आतापर्यंत एकूण 7,88,601 युनिट रक्त एकत्रित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रक्तदान शिबीरासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या संपूर्ण र्स्टोंचे सहकार्य लाभले.
प्रास्तविक किशोर खुबचंदानी व सौ.दिपाली टकले यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी भोसले यांनी केले. शेवटी निरंकारी सेवादल संचालक आनंद कृष्णानी यांनी आभार मानले.
तसेच ‘‘ मानव एकता दिवस’ निमित्त निमित्त विशेष सत्संग प्रवचन समारोहचे आयोजन ही निरंकारी भवनच्या प्रांगणात करण्यात आला होता. श्री. अशोकलालजी आहुजा (पुणे निवासी) यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.यावेळी भुतपूर्व सद्गुरु बाबा गुरबचनसिंहजी महाराज यांनी विश्वबंधुत्व, वैश्विक शांतीच्या प्रसाराचे व मानव एकता तसेच मानव कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानांचे स्मरण करण्यात आले.
बाबा गुरबचन सिंहजी महाराजांच्या महान जीवन व कार्यांमधून प्ररेणा घेण्यासाठी तसेच त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने येथे एकत्रित आलो असल्याचे श्री.अशोकजी आहुजा यांनी सांगितले.
सत्संग प्रवचन कार्यक्रमासाठी नगर शहर व परिसर तसेच पारनेर, सोनई, शेडगांव, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पिंपळा, टाकळी ढोकेश्वर आदि अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.









