नगर - संपूर्ण कुटूंबाला सुशिक्षित करण्यासाठी स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे फुले दाम्पत्यांना समजले होते. त्यामुळेच त्यांनी स्त्री ...
नगर - संपूर्ण कुटूंबाला सुशिक्षित करण्यासाठी स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे फुले दाम्पत्यांना समजले होते. त्यामुळेच त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आणि पुण्यात स्त्री शिक्षणाची पहिली शाळा उघडली. त्यांच्या कार्याचा वसा अनेकांनी पुढे चालविला. महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी दिपस्तंभासारखे आहे. महिला हीच समाजाची खरी अर्धांगिनी आहे, त्यामुळेच महिला या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिरच्यावतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन नगरसेवक बाळासाहेब बोराटे, जालिंदर बोरुडे, शेखर व्यवहारे, बाळासाहेब कानडे, विष्णू होले, दत्तात्रय शेलार, विष्णू म्हस्के, दिलीप पांढरे, प्रा. रंगनाथ डागवाले, दत्ता जाधव, दत्ता कावरे, अनिल शिंदे, अशोक गायकवाड आदिंसह मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका आदि उपस्थित होते.









