Archive Pages Design$type=blogging

बैठकीतील गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करीत मोबाईलवर अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करण्यात अधिकारी मग्न

संगमनेर - तालुक्यातील वाढता दुष्काळ व गंभीर पाणीटंचाई या संदर्भातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकी...



संगमनेर - तालुक्यातील वाढता दुष्काळ व गंभीर पाणीटंचाई या संदर्भातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत काही अधिकारी, कर्मचारी हे बैठकीतील गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करीत मोबाईलवर अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करण्यात व्यस्त असलेले चित्र निदर्शनास आले आहे. यातून या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुष्काळ आणि टंचाई बैठकांचे कीती गांभीर्य आहे, हेच दिसून आले. 

खासदार लोखंडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीत सोमवारी झालेल्या बैठकीत तहसीलदार शरद घोरपडे, नायब तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, जनार्दन आहेर, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपसभापती शालिनी ढोले, बाळासाहेब गायकवाड, अॅड. दिलीप साळगट, अमोल कवडे, किशोर डोके आदी उपस्थित होते. 

अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी कामे करत नसल्याचे अनेकांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिले. बैठकीत राजकारण आल्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले. परंतु काही ग्रामसेवक, विविध कर्मचाऱ्यांना मात्र दुष्काळाचे गांभीर्य नव्हते. उपस्थित ग्रामसेवक, कर्मचारी, अधिकाऱ्यांपैकी अनेकजण आपल्या मोबाइलवर ऑनलाइन होते. बैठकीत एकाला मोबाइलवरील अश्लील चित्रफित बघण्याचा मोह आवरला नाही. सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असताना एक कर्मचारी मात्र अश्लील चित्रफित डाऊनलोड करण्यात मग्न होता. बैठकीत तालुक्याच्या विविध भागातील लोकांनी पाण्यासंबंधी सूचना मांडल्या. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आदेश देऊनही येथील जीवदया मंडळाच्या पांजरापोळला पाणी मिळत नसल्याने अमर कतारी आणि जीवदयाचे राजेश दोषी संतापले होते. या विषयावरून तहसीलदारांनी केवळ अर्ज असल्याचा प्रस्ताव नसल्याचे सांगितले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: बैठकीतील गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करीत मोबाईलवर अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करण्यात अधिकारी मग्न
बैठकीतील गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करीत मोबाईलवर अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करण्यात अधिकारी मग्न
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggcQLLueXq5udbIG-7V1H7beshrUnYRd3BjjJUH48tn_ZRJ0rhtxvBQAS_YMHInvO5M2Ge6x-5sBG5Sg_l9beTSh-c6OihGDh6zMSWyyD-aQjWKw1AjHd-WUsbmg767QAGiXHYoRyQq6m_/s1600/213.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggcQLLueXq5udbIG-7V1H7beshrUnYRd3BjjJUH48tn_ZRJ0rhtxvBQAS_YMHInvO5M2Ge6x-5sBG5Sg_l9beTSh-c6OihGDh6zMSWyyD-aQjWKw1AjHd-WUsbmg767QAGiXHYoRyQq6m_/s72-c/213.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_757.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_757.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago